Monday, December 23, 2024
Homeसांगलीपत्नीस छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला न्यायालयाने दिला सक्तमजुरी

पत्नीस छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला न्यायालयाने दिला सक्तमजुरी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मानपानाच्या कारणावरून छळ करून पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकास न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा व दंड ठोठावला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी चंद्रकांत सोपान भारते राहणार माधळमुटी तालुका खानापूर याचे रूपाली सोबत 20 जून 2006 रोजी विवाह झाला होता.लग्नात योग्य तो मान पान झाला नाही असे म्हणतात आरोपी पतीने रूपालीस दारू पिऊन मारहाण करत होता .



याबाबत रुपालीने घरच्यांना सांगितले होते घरच्यांनी चंद्रकांत याला समजून सांगूनही त्याच्या मध्ये काही फरक पडला नाही लग्न झाल्यानंतर सहा महिन्यात रूपाली हिने पेटवून घेऊन आत्महत्या केली होती . याबाबत रूपाली ची आई सुनीता शिवाजी सूर्यवंशी यांनी आरोपीच्या विरुद्ध विटा पोलिसात गुन्हा दाखल केला होता .सदर खटल्याचा निकाल लागला असून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी .पी. सातवळेकर यांनी आरोपी चंद्रकांत सोपान भारते याला दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दोन हजार रुपये दंड केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -