Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरशाहू महाराजांच्या विचारांचा वारसा हेरवाड गावाने पुढे नेला : चित्राताई वाघ

शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा हेरवाड गावाने पुढे नेला : चित्राताई वाघ

कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. विधवा प्रथा बंद करून राजर्षि शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा हेरवाड गावाने पुढे नेण्याचे काम केले आहे. आपण सर्वांनी एवढ्यावरच न थांबता विधवा महिलांच्या हाताला काम मिळण्यासाठी तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून केंद्राच्या वतीने विधवा महिलांच्यासाठी विविध योजना राबविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी केले.



प्रारंभी स्वागत सरपंच सुरगोंडा पाटील यांनी केले. हेरवाड ग्रामपंचायतीच्या वतीने विधवा प्रथा बंद केल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच सुरगोडा पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी त्या पुढे म्हणाल्या, फक्त ठराव करून परिपत्रके काढून चालणार नाही याचे विचार समाजात रुजविणे गरजेचे आहे.
याचा प्रचार आणि प्रसार गावात झाला पाहिजे तसेच या अनिष्ठ रुढी परंपरेतून बाहेर पडणे महत्वाचे आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी हेरवाड गावाला १० लाखांचा निधी जाहीर करून या गावाचा सन्मान केला आहे. या ठरावामुळे महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला असल्याचे सांगितले.



यावेळी ठरावातील सुचक, अनुमोदक व ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर तसेच विधवा प्रथेला मुठमाती देणार्‍या तुळसाबाई गायकवाड, कविता नाईकवाडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शौमिका महाडिक, सोनाली मगदूम जोत्स्ना यादव यांची मनोगते झाली.

यावेळी जि.प. सदस्य विजय भोजे, अशोकराव माने, राजवर्धन नाईक निंबाळकर, पंचायत समिती सदस्या मिनाज जमादार, भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष पृथ्वीराज यादव, सोनाली मगदूम, आर.बी. पाटील, संगिता पाटील, वैशाली पाटील, औरंग शेख, मयुर खोत, राजापूर सरपंच संजय पाटील, आयुब पठाण, अजित अकिवाटे, सुदर्शन पारसकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचलन दिलीप शिरढोणे यांनी केला आभार ग्रा.पं. सदस्य सुकुमार पाटील यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -