ताजी बातमी ऑनलाईन टीम
इचलकरंजी पासून जवळच असलेल्या तारदाळ रोड कोरोची ( ता. हातकणंगले ) येथील कुंथीनाथ सांगले यांच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत एका ५५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबतची माहिती पोलीस पाटील सावकार हेगडे यांनी शहापूर पोलीस ठाण दिली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तारदाळ मार्ग जाणाऱ्या रोड लगत आत एक किलोमीटर वर आतील शेतात हा मृतदेह आढळला. त्या मृतदेहाचा चेहरा सडला असून ओळख पटने मुश्कील बनले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.