ताजी बातमी ऑनलाईन टीम
छत्रपती शिवाजी महाराज रोडवर आज प्रवास करताना अभिमान वाटण्यापेक्षा अंगावर काटा मारल्या शिवाय राहत नाही जीव मुठीत घेऊन या धोकादायक रस्त्यावर प्रवास करावा लागत आहे या रस्त्यावर आज ट्रकने MSCB खांबा धडक दिल्याने खांब अंगावर कोळसून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
इरफान बारागिर राहणार खाँजा बस्ती असे जखमी तरुणाचे नाव आहे छत्रपती शिवाजी क्रीडांगण भीती लागत MSCBच्या सिमेंट खांबावर ट्रक चढल्याने खांब मुळातून तुटून समोर दुचाकी वरून येणाऱ्या इरफान बारागिर यांच्या अंगावर पडला या अपघातात गंभीर जखमी झाल्याने इरफानला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले ट्रक हा छत्रपती शिवाजी महाराज रोड मार्गे गोवा कडून भूपाळ कडे जात होते यावेळी प्रवाशांनी चालकला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले छत्रपती शिवाजी महाराज रोडचे काम संथ गतीने सुरू आहे 24 कोटी मंजूर झालेल्या या रस्त्याच्या कामाला सुरुवात केलेल्या ठेकेदाराने भर टाकून रस्ता मृत्यूचा सापळा केला आज क्रीडांगण शेजारी तीन ते साडे तीन फूट भर रस्त्यावर पडल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे अवजड वाहने केव्हा ही पलटी होण्यासारखा चढ उतार या ठिकाणी निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिकांनी ठेकेदारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे