ताजी बातमी ऑनलाईन टीम
नैऋत्य मोसमी वारे केरळच्या वेशीपाशी पोहोचले असून, येत्या 2 ते 3 दिवसांत मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने आज येथे वर्तवला आहे.
मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असून, गेल्या दोन दिवसांत त्याने तो पुढे सरकला आहे. शुक्रवारी दक्षिण अरबी समुद्र, संपूर्ण मालदीव, लक्षद्वीपचा आणि कॉमेरुनचा काही भाग त्याने व्यापला.
दक्षिण अरबी समुद्रात पश्चिमी वाऱ्याची गती वाढली आहे. तसेच केरळ किनारपट्टी व दक्षिण अरबी समुद्रात ढगांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसांत मान्सून केरळात दाखल होण्याचे संकेत आहेत. अरबी समुद्र तसेच लक्षद्वीपचा आणखी काही भाग व्यापण्यास पोषक स्थिती आहे. दरम्यान, केरळात पुढील चार दिवसांत जोरदार पाऊस होणार आहे.