ताजी बातमी ऑनलाईन टीम
बॉलिवूड ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. रितेशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर राखी आता आदिल खान दुर्रानीसोबत (Aadil Khan Durrani) आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगत आहे. आदिलने आपल्या आयुष्यात पुन्हा आनंद आणल्याचं राखी सांगतेय.
रोशिना देलावरी नावाच्या मुलीने राखीला फोन करून तिच्या नात्याबद्दल सांगितलं तेव्हा तिची उद्योगपती असणाऱ्या आदिलसोबत ओळख झाली. आणि ही ओळख आता प्रेमात बदलली आहे. राखीने नुकतंच एका मुलाखती दरम्यान आपला बॉयफ्रेंड (Boyfreind) आदिल आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड रोशिनाबाबत अनेक खुलासे केले आहेत.
राखी सावंत (bollywood news)सध्या आपल्या नव्या बॉयफ्रेंडमुळे चांगलीच चर्चेत आलीये. राखी सावंतचा नवा बॉयफ्रेंड आहे आदिल खान दुर्रानी. हा आदिल खान दुर्रानी सध्या दुबईत आहे. याठिकाणी दोघेही दर्जेदार वेळ घालवत आहेत. विशेष म्हणजे राखीसाठी आदिलने दुबईत घर घेतलं आहे. यापूर्वी त्याने तिला बीएमडब्ल्यू कार भेट दिली होती. या दोघांनी टाइम्सला एक फोनेटिक मुलाखत दिली. ज्यामध्ये आदिलने राखीजवळ एका गोष्टीची मागणी केली आहे.