ताजी बातमी ऑनलाईन अर्ज
आयपीएल २०२२ चा विजेता ((IPL 2022 Final) कोण होणार? याकडे संपूर्ण किक्रेट विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. विजेतेपदासाठी रविवारी (दि.२९) गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ भिडणार आहेत. साखळी सामन्यात नवख्या गुजरात संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यात विजय मिळवून विजेतेपदाचा करंडक उंचावण्यास हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात संघ उत्सुक असेल.
आयपीएल २०२२ च्या या मोसमात गुजरातचा संघ ज्या प्रकारे खेळला आहे, ते पाहता यावेळी चाहत्यांना नवा चॅम्पियन मिळणे जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. गुजरातने पहिल्या साखळी फेरीत १० विजयांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर स्थान पटकावले. त्यानंतर शेवटच्या षटकात पात्रता फेरीत १८८ धावांचे यशस्वी पाठलाग करून अंतिम फेरीत (IPL 2022 Final) धडक मारली.
IPL 2022 Final : IGRICHETTY विनर्सचा अधिक भरणा
आयपीएलच्या या मोसमात राजस्थानविरुद्ध गुजरातचा वरचष्मा आहे. कारण गुजरातकडे उर्वरित संघांपेक्षा जास्त मॅच विनर्स आहेत. गुजरातने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ८ सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला आहे. प्रत्येक सामन्यात संघासाठी वेगवेगळ्या खेळाडूंनी मॅच विनर्सची भूमिका निभावली आहे. कर्णधार हार्दिक पांड्याने गुजरातसाठी फिनिशरची भूमिका बजावली आहे. तर कधी राशिद खानने फलंदाजीत चमकदार कामगिरी करत सामना खिशात घातला आहे. उर्वरित संघांनी डेव्हिड मिलरपासून दूर राहिल्यावर पहिल्यांदाच गुजरातमध्ये दाखल झालेल्या मिलरने स्वतःच्या जोरावर गुजरातला दोन सामन्यांत विजय मिळवून दिला आहे. राहुल तेवतिया यांनेही मॅच फिनिशर म्हणून संघाच्या विजयाला हातभार लावला आहे. तर कधी रशीदने गोलंदाजीच्या बळावर पारडे फिरवले आहे.