पाळी म्हटलं की आजही लोकांच्या भूवया उंचावतात. स्त्रीचे महिन्याच्या मासिक पाळीचे ‘हे चार’ दिवस आजही तिच्या पुरते मर्यादीत आहेत असे म्हंटल तर वावग ठरणार नाही. थोडक्यात हे दिवस तेरे भी चूप और मेरे भी चूपवाले आहेत. मागील काही वर्षांमध्ये परिस्थिती बदलत असली तरी याचे प्रमाण खूप कमी आहे. आज जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन. हा मे महिन्याच्या २८ मे रोजीच का साजरा करतात हे जाणून घेवूया…
आजही आपल्याकडची परिस्थिती पाहता मासिक पाळीवर बिनधास्तपणे आणि जाहीरपणे बोलणं टाळलं जातं. पाळी म्हटलं की कुजबूज ऐकायला मिळते. बहूतांश महिला आजही मासिक पाळीच्या संबधित माहीतीबद्दल अनभिज्ञ आहेत.
मासिक पाळी आल्यानंतर घ्यावयाची काळजी, पाळी येण्या गोदर आणि नंतर आपल्या शरीरात होणारे बदल, मानसिकतेत होणारे बदल, आजार याबद्दल माहिती नाही किंवा अपूरी आहे. ही परिस्थिती फक्त ग्रामीण भागातच आहे का ? तर अजिबात नाही शहरातही फारशी वेगळी परिस्थिती नाही. महिलांनी मासिक पाळीच्या दिवसात कशी स्वच्छता घ्यायची याबद्दल माहीती मिळावी, त्यांच्यात जागरूकता वाढावी यासाठी हा दिन मे महिन्याच्या २८ तारखेला साजरा केला जातो.
Menstrual Hygiene Day: २८ मे रोजीच का साजरा करतात मासिक पाळी स्वच्छता दिन?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -