ताजी बातमी ऑनलाईन अर्ज
मुंबई : कुात घरफोड्या करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. हा तरुण युट्युबर म्हणून मिरवत होता. चोरीच्या पैशांतून मौजमजा करत त्याने व्हिडीओ बनवले. अनेक घरांमध्ये हातचलाखीनं त्यांनी चोऱ्या केल्या. या चोरट्याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या असून युट्युबर तरुणाचं नाव अभिनव गुप्ता असल्याचं समोर आलं आहे.
अभिनव गुप्ता या 26 वर्षांचा असून त्याच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे या चोरट्याचा शोध घेण्यासाठी जवळपास दीडशे सीसीटीव्ही कॅमेरांमधील फुटेज (Mumbai Police CCTV Footage) पोलिसांनी तपासलं. त्यातून या तरुणाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. अनेक गुन्हे या तरुणाच्या नावावर असल्याचंही पोलिसांच्या
तपासातून समोर आलं. बारावी पर्यंत शिकलेल्या या युट्युब तरुणाची आता कसून चौकशी केली जातेय.
बंद घरांची चोरी
बंद घरांमध्ये चोऱ्या करण्याची अभिनवला सवय होती. बंद घरांमध्ये घुसून घरातील सोनं आणि मुद्देमालाची चोरी करणाऱ्या या तरुणाचा शोध पोलीस अनेक दिवसांपासून करत होते. कुर्ला पश्चिमेच्या ख्रिश्चन गावात 18 मे रोजी चोरीची घटना घडली होती. एका घरामधून तब्बल 25 तोळे सोनं या चोरट्यानं लंपास केलं होतं. याप्रकरणी व्ही.बी.नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.