Friday, November 22, 2024
Homeबिजनेसदोन हजारांच्या नोटांना पसंती कमी; व्यवहारात 500 रुपयाच्या नोटेची 'हवा'

दोन हजारांच्या नोटांना पसंती कमी; व्यवहारात 500 रुपयाच्या नोटेची ‘हवा’

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भारतात डिजिटल व्यवहार रेकॉर्ड स्तरावर असले तरी आणि युपीआय पेमेंटला प्राधान्य आणि पसंती मिळत असली तरीही देशात रोखीच्या व्यवहारांचा धडाका सुरूच आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये चलनातील नोटांचे मूल्य 9.9 टक्क्या र वाढून 31 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षी 16.8% होते. बँकर्सच्या मते, पेमेंटमध्ये डिजिटल व्यवहारांचा वाटा वाढत असल्याने बँक नोटांची मागणी व्यवहारांऐवजी त्याचा साठा करण्यासाठी वाढलेली आहे.



जास्त मूल्याच्या नोटांच्या मागणीचा अर्थ असा होता की, 10 रुपये आणि त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटांची संख्या कमी झाल्याने नोटांचे प्रमाण केवळ 5% वाढले. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कमी किंमतीचे व्यवहार जात असल्याचे हे आणखी एक द्योतक आहे. याचा अर्थ डिजिटल पेमेंट मध्ये वाढ झाली असली तरी कमी मुल्यांचे व्यवहार यामाध्यमातून वाढले आहेत. अगदी नाण्यांची मागणीदेखील (indent) आर्थिक वर्ष 2021 मधील 300 कोटींवरून आर्थिक वर्ष 2022 मध्ये 80 कोटींवर घसरली आहे.



मूल्याच्या दृष्टीने, यावर्षी 31 मार्चपर्यंत चलनात असलेल्या एकूण नोटांपैकी 500 रुपये आणि 2,000 रुपयांच्या नोटांचा वाटा एकत्रितपणे 87.1% होता, जो 31 मार्च 2021 पर्यंत 85.7% होता. एक गठ्ठा विचार करता, 500 रुपये मूल्याचा वाटा सर्वाधिक 34.9% होता, त्यानंतर 10 रुपयांच्या नोटांचा क्रमांक लाग जो 31 मार्च 2022 पर्यंत चलनात असलेल्या एकूण नोटांच्या 21.3% होता.


बनावट नोटांच्या संख्येत वाढ
आर्थिक वर्ष 2022 मध्ये सापडलेल्या बनावट नोटांच्या (fake currency) संख्येत वाढ झाली असून आर्थिक वर्ष 2021 मध्ये 2 लाखांच्या तुलनेत यंदा 2.3 लाख बनावट नोटा सापडल्या आहेत. 500 रुपये मुल्यांच्या (denomination) बनावट नोटांची संख्या मागील वर्षीच्या 39,453 वरून दुपटीने वाढून 79,699 वर पोहोचली आहे. आरबीआयने वर्षभरात नोटांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, 100 रुपयांच्या नोटेला सर्वात जास्त पसंती मिळाली, तर 2,000 रुपयांच्या नोटेला सर्वात कमी पसंती मिळाली. नाण्यांमध्ये, 5 रुपयांला सर्वाधिक पसंती होती, तर 1 रुपयाला सर्वात कमी पसंती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -