Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगमी पत्रकार परिषदेत सत्य तेच बोललो : संभाजीराजे

मी पत्रकार परिषदेत सत्य तेच बोललो : संभाजीराजे

ताजी बातमी ऑनलाईन टीम

छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू असताना शाहू महाराज यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती. यावर आता संभाजीराजे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण करुन पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही.”


काय म्हणाले होते शाहू महाराज ? शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज घराण्याचा अपमान केलेला नाही. संभाजीराजे यांच्या राज्यसभा उमेदवारी विषयी मुख्यमंत्र्यांनी यू-टर्न घेतलेला नाही, असे मत शाहू महाराज यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले होते.
शाहू महाराज म्हणाले की, “संभाजीराजे यांना राज्यसभा निवडणुकीत अपक्ष उभे राहायचे होते. यासंदर्भात त्यांनी इतर पक्षाच्या नेत्यांनाही भेटणे गरजेचे होते. तसेच त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही भेटले पाहिजे होते. सेना आणि संभाजीराजेंमध्ये झालेला ड्राफ्ट हा कच्चा होता. भाजपने दिलेली खासदारकीलाही संभाजीराजेंचा विरोध होता”.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -