Sunday, December 22, 2024
Homeदेश विदेशकोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची महाराष्ट्रात धडक ! पुण्यात आढळले 7 रुग्ण

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची महाराष्ट्रात धडक ! पुण्यात आढळले 7 रुग्ण

ताजी बातमी ऑनलाईन टीम

देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Update) कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता राज्यासाठी एक चिंताजनक बातमी आलीय. राज्यात कोरोनाचा विषाणूच्या नव्या व्हेरिएंटने धडक दिल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट BA4 आणि BA5 चे 7 रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य खातं खडबडून जागं झालं आहे. पुण्यात ओमायक्रॉनचे 2 नवे सब व्हेरिएंट BA4 चे चार आणि BA5 चे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यात 4 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे.



त्यातील चार रुग्ण हे 50 पेक्षा जास्त वय असलेले, 2 रुग्ण 20 ते 40 मधील, तर एक रुग्ण हा 10 वर्षाखालील असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय. महत्वाची बाब म्हणजे हे नवे व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य (Contagious) असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. दरम्यान. आज राज्यात 529 नवे कोरोना रुग्ण आढळून आले

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -