ताजी बातमी ऑनलाईन टीम
Insidesport ला बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बक्षीस रक्कमेत वाढ, हा विषय चर्चेत आहे. पुढील आयपीएलमध्ये २० ते २५ टक्के वाढ करण्याचा विचार सुरू आहे, परंतु अद्याप नेमकी किती रक्कम हे ठरलेले नाही. आयपीएल २०२३ला सुरूवात होण्यापूर्वी त्याची घोषणा केली जाईल.” २०१६मध्ये आयपीएलच्या बक्षीस रक्कमेत वाढ करण्यात आली होती.
आयपीएल २०२२ ची बक्षीस रक्कम ( IPL 2022 Prize Money)
• विजेता संघ – २० कोटी
• उपविजेता – १३ कोटी
• तिसरा क्रमांक-७ कोटी
• चौथा क्रमांक-६.५ कोटी
२०१६नंतर २०१७मध्ये बक्षीस रक्कम कमी करून १५ कोटी करण्यात आली होती. त्यानंतर २०१८मध्ये ती पुन्हा २० कोटी करण्यात आली. २०२०मध्ये कोरोनामुळे ही रक्कम १० कोटी करण्यात आली होती. पण, यावेळेस बीसीसीआयने स्पॉन्सरशीपमधून विक्रमी १००० कोटी कमावले.