Sunday, December 22, 2024
Homeदेश विदेशअकराव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी खूशखबर! या दिवशी जमा होणार 2000 रुपये

अकराव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी खूशखबर! या दिवशी जमा होणार 2000 रुपये

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पीएम किसान सन्मान निधीचा 11वा हप्ता मिळण्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा लांबत चालली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता ही प्रतिक्षा संपली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (PM Kisan Samman Scheme) 11 वा हप्ता 31 मे रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या (Beneficiary Farmers) बँक खात्यांमध्ये जमा केला जाणार आहे.



शेतकऱ्यांना यो योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे 11वा हप्ता ( PM Kisan 11th Installment) खात्यात जमा होण्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकारने प्रधानमंत्री सन्मान किसान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरू केली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 हप्ते जमा झाले आहेत. आता 11वा हप्ता 31 मे रोजी डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल.

ऑनलाइन ई-केवायसी कसे करावे?
यासाठी सर्वप्रथम पीएम किसान वेबसाइट https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या.
त्यानंतर ‘फार्मर्स कॉर्नर’ मधील e-KYC टॅबवर क्लिक करा.
जे पेज उघडेल त्यावर आधार क्रमांकाची माहिती द्या आणि सर्च बटनावर क्लिक करा
यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल
त्यानंतर सबमिट ओटीपीवर क्लिक करा आणि ओटीपी टाकून सबमिट करा.
तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण होईल.
यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -