Sunday, December 22, 2024
Homenewsराज्यात डेल्टा प्लसचे आणखी 10 नवे रुग्ण

राज्यात डेल्टा प्लसचे आणखी 10 नवे रुग्ण



राज्य बऱ्यापैकी अनलॉक झालेले असलं तरी सुदैवाने अजूनही राज्यातली कोरोना रुग्णवाढ आटोक्यात आहे. कारण काल दिवसभरात राज्यात 4 हजार 145 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5 हजार 811 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. दुसरीकडे 24 तासांत 100 रुग्णांचा मृत्यू झाला. या घडीला राज्यात 62 हजार 452 एक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. मात्र, असे असताना चिंता वाढवणारी बातमी हाती आली आहे.

राज्यात डेल्टा प्लसचा वाढता धोका दिसून येत आहे. आणखी 10 नवे रुग्ण वाढले आहेत.
कोल्हापूर , रत्नागिरी , सिंधुदुर्ग या जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण वाढले आहेत. राज्यात आता डेल्टा प्लस रुग्णांची संख्या आता 76 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत डेल्टा प्लसच्या 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


तर दुसरीकडे शॉपिंग मॉलमध्ये अल्पवयीन मुला-मुलींच्या प्रवेशावरील बंदी उठवण्यात आली आहे. 18 वर्षांखालील वयाचा पुरावा दाखवून मॉलमध्ये प्रवेश मिळवता येणार आहे. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेलं शाळा-महाविद्यालयाचं ओळखपत्रंही ग्राह्य धरण्यात येणार आहे. ब्रेक द चेनच्या अंतर्गत राज्य सरकारनं सुधारित आदेश जारी केला आहे. प्रौढांसाठी मात्र दोन डोसचे प्रमाणपत्र बंधनकारकच राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -