मिरज / प्रतिनिधी
कवठेमहांकाळ ते जत रोडवर असणारे अलकुड फाटा या ठिकाणी असलेले मका फॅक्टरीमध्ये चोरी झाल्याचा प्रकार घडला होता. सदर बाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शहाणे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ पोलीस ठाणे कडील डीबी पथकाने तात्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन धडक कारवाई केली आहे. यावेळी चार आरोपींसह मका फॅक्टरीमधील लोखंडी साहित्य, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी मालवाहतूक गाडीसहित अंदाजे दोन लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, अलकुड फाटा येथील मका प्रक्रिया कारखान्यातील सुमारे 62 हजार 600 रुपये किमंतीच्या लोखंडी साहित्याची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शहाणे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ पोलीस ठाणे कडील डीबी पथकाने ओळख तपासाची चक्रे वेगाने फिरवत याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. करण अजित गोसावी (वय 22), किरण शामराव गोसावी (वय 20), भरत नामदेव जाधव (वय 39), दत्तात्रेय वसंत माने (वय 44) सर्वजण (रा.अहिल्यानगर प्रकाशनगर कुपवाड) अशी सदर आरोपींची नावे आहेत. मका फॅक्टरी मधील लोखंडी साहित्य व आरोपींच्या गाडी सहित अंदाजे रक्कम दोन लाख 65 हजारांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहायक पोलिस निरीक्षक सागर गोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक करे, पोलीस नाईक आमिरशा फकीर, चंद्रसिंग साबळे, पांडुरंग वाघमोडे, पोलीस शिपाई दीपक पवार, कोळेकर, संदीप साळुंखे,विनोद चव्हाण यांनी केली.