Thursday, July 31, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : वैद्यकीय अधिकाऱ्यास पाच हजारांची लाच घेताना अटक

कोल्हापूर : वैद्यकीय अधिकाऱ्यास पाच हजारांची लाच घेताना अटक

मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडे पुरवणी बिले काढण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना मलकापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशितोष अरुण तराळ (वय 38, सध्या रा. शासकीय वसाहत, मलकापूर ग्रामीण रुग्णालय, मूळ गाव रा. शिव-शंकर वसाहत, कुरूंदवाड, ता. शिरोळ) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार केलेल्या पडताळणीत डॉ. आशितोष तराळ याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची पुरवणी बिले विनात्रुटी पुढे पाठविण्यासाठी पाच हजार रुपये व निरोप समारंभासाठी सात हजार रुपये, अशी बारा हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी यातील पाच हजार रुपयांची मागणी करून ते घेऊन येण्यास सांगितल्याचेही स्पष्ट झाले. त्यानंतर सापळा रचून तक्रारदाराकडून डॉ.तराळ याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याबाबत शाहूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. कारवाईत पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव, पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या यंत्रणेने परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -