Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगब्रेकिंग : पुन्हा एकदा दिलासा; गॅस सिलिंडर झाले स्वस्त

ब्रेकिंग : पुन्हा एकदा दिलासा; गॅस सिलिंडर झाले स्वस्त

सातत्याने होत असलेल्या महागाईपासून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल, LPG, CNG तसेच इतर दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र मागील आठवड्यात पेट्रोल-डिझेलवरील कर कमी झाले आणि 7-8 रुपयांनी इंधन स्वस्त झाले. आता जूनच्या पहिल्याच दिवशी आपल्या खिशाचा भार हलका करणारी बातमी आहे.

देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं (Indian Oil Corporation, IOC) व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि मोठ्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः हॉटेल व्यावसायिकांसाठी हा निर्णय एकदम फायद्याचा ठरणार आहे. एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे ती म्हणजे, घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाहीय.

राजधानी दिल्लीत अनुदानाशिवाय (सबसिडी) 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत 999.5 रुपयांवर कायम आहे. मुंबईतही (Mumbai) या सिलिंडरची किंमत 999.5 रुपये आहे. कोलकात्यात त्याची किंमत 1026 रुपये आणि चेन्नईमध्ये त्याची किंमत 1015.50 रुपये आहे.

एलपीजी सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनी IOC च्या वेबसाइटवर जावं लागेल. इथं कंपन्या दर महिन्याला नवीन दर जारी करतात. (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) या लिंकवर तुम्ही तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -