Tuesday, July 29, 2025
Homeसांगलीसांगली :  घरावर सशस्त्र दरोडा 58 हजारांचा ऐवज लंपास

सांगली :  घरावर सशस्त्र दरोडा 58 हजारांचा ऐवज लंपास

मिरज तालुक्यातील संतोषवाडी येथे घराचा दरवाजा फोडून तसेच घरातील महिलांना हत्यारांचा धाक दाखवून सुमारे 58 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. शनिवारी रात्री एक वाजता ही घटना घडली. याबाबत सुमन देवेंद्र उपाध्ये (वय 65) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

सुमन उपाध्ये यांचे संतोषवाडी येथे घर आहे. शनिवारी रात्री घरातील सर्व सदस्य जेवण करुन झोपी गेले. त्यानंतर रात्री एकच्या सुमारास दोघा दरोडेखोरांनी त्यांच्या घराच्या दरवाजावर दगड घालून दरवाजा फोडला. त्यानंतर आत प्रवेश करुन धारदार हत्यारे आणि लोखंडी हातोडीने ठार मारण्याची धमकी दिली. घरातील महिल्यांच्या अंगावरील सोन्याची कर्णफुले, मंगळसुत्र आणि दीड हजार रुपयांची रोख रक्कम असा 58 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. उपाध्ये यांच्या घरातील लोकांनी आरडाओरडा करताच सदर चोरटे पळून गेले. उपाध्ये यांनी फिर्यादीमध्ये दोघा चोरट्यांचे वर्णन केले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -