Monday, July 28, 2025
Homeमनोरंजन'सम्राट पृथ्वीराज'चा दुसरा ट्रेलर रिलीज, अक्षयच्या रोमांचक भूमिकेने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

‘सम्राट पृथ्वीराज’चा दुसरा ट्रेलर रिलीज, अक्षयच्या रोमांचक भूमिकेने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बाहुप्रतिक्षीत चित्रपट ‘साम्राट पृथ्वीराज’ सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अंगावर शाहारे आणणारा हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या ट्रेलरमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. या ट्रेलरमध्ये सम्राट पृथ्वीराज यांच्या दमदार भूमिकेत असलेल्या अक्षय कुमारने चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. ट्रेलरमध्ये अक्षय राजाचे कर्तव्य बचावताना दिसत आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री मानुषी छिल्लर मुख्य भुमिकेत दिसणार आहे. हे दोन्ही कलाकार सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

अक्षय कुमारने हा ट्रेलर आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. तो शेअर करता त्याने कॅप्शनमध्ये “सत्य आणि सन्मानासाठी महान युद्ध, पाहा शेवटचा हिंदू सम्राट सम्राट पृथ्वीराज चौहान. हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज होत आहे. 3 जून रोजी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात साजरा करा ‘सम्राट पृथ्वीराज’” असे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान सम्राट पृथ्वीराज चित्रपटाचाच्या नावावर मोठा वाद निर्माण झाला होता. हे नाव बदलण्यासठी करणी सेनेकडून आंदोलन करण्यात आलं होतं. या चित्रपटाचे आधीचे नाव ‘पृथ्वीराज’ असे होते. परंतु आता ते बदलून ‘सम्राट पृथ्वीराज’ करण्यात आले आहे. साम्राट पृथ्वीराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अक्षय कुमार हा सम्राट पृथ्वीराज तर मानुषी छिल्लर ही संयोगिताची भूमिका साकारत आहे. अक्षयच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे.

सम्राट पृथ्वीराज चित्रपट 3 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित केला जाईल. मानुषी छिल्लर संयोगिताच्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -