विजयसिंह उर्फ रिंकू देसाई याचा शिंगणापूर येथील समर्थक वरेकर याच्या घरावर सोमवारी पहाटे आठ ते दहा जणांच्या गटाने तुफान दगडफेक करून कार पेटवली(arson) होती. या प्रकरणी करवीर पोलिसांनी ९ जणांवर गुन्हा दाखल केला असून, चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी धरपकड सुरू केल्यामुळे सराईतांची तारांबळ उडाली आहे.
राजू सोनबा बोडके (वय ३१.रा.लक्षतीर्थ वसाहत), तानाजी धोंडिराम कोळापटे (वय २७, रा. फुलेवाडी), उमेश धोंडिराम कोळापटे (वय २९, रा. फुलेवाडी), सौरभ सुनील जाधव (वय २०, रा. आपटेनगर, वाशी नाका) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत, तर इतर अल्पवयीन पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. दि. १५ मे रोजी विजयसिंह ऊर्फ रिंकू देसाई याचा वाढदिवस होता, त्यामुळे फुलेवाडी परिसरात फलक लावले होते. यातील काही फलक युवकांनी फाडले. त्यामुळे त्यांच्यात वादावादी होऊन दोघांवर लक्षतीर्थ वसाहत येते तलवार हल्ला झाला होता(arson). या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे, तर रिंकू देसाई फरारी झाला आहे. पोलिस त्याच्या मागावर आहेत. परिसरात गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे.