Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाSourav Ganguly: बीसीसीाय अध्यक्ष सौरव गांगुली खेळणार नवी इनिंग, राजकारणात करणार प्रवेश?

Sourav Ganguly: बीसीसीाय अध्यक्ष सौरव गांगुली खेळणार नवी इनिंग, राजकारणात करणार प्रवेश?

ताजी बातमी ऑनलाईन टीम
Sourav Ganguly:भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली क्रिकेटमधील 30 वर्षे पूर्ण केल्यानंतर आयुष्यात नवीन पाऊल टाकणार आहेत. आता काही वेळापूर्वीच ट्विट करून त्याने चाहत्यांना माहिती दिली की, तो त्याच्या आयुष्यात काहीतरी नवीन करणार आहे आणि त्यातही त्याला चाहत्यांचे प्रमे असेच मिळत राहील अशी अपेक्षा गांगुलीने (Ganguly) व्यक्त केली आहे. सौरव गांगुली क्रिकेटच्या डावातून बाहेर पडून राजकारणात उतरणार (Ganguly Enter politics?) असल्याची अटकळ बांधली जात आहे. मात्र दादांने अद्याप स्पष्ट शब्दात त्यांचे पत्ते उघडले नसले नाही. मात्र आपण काहीतरी नवीन करणार असल्याची माहिती त्याने ट्विट करून नक्कीच दिली आहे.


गांगुली नवीन काय करणार आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, त्याने नुकतीच अमित शहा यांची भेट घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप नेते अमित शहा (Amit Shah) यांनी गांगुलीच्या कोलकाता येथील घरी जेवण देखील केले. सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र आजपर्यंत प्रत्येक वेळी त्यांने राजकारणाच्या चर्चांपासून दूर राहणे पसंत केले आहे. या ट्विटनंतर सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या. मात्र बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी काही क्षणातच गांगुलीने आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नसल्याचे स्पष्ट केले.



सौरव गांगुलीची कारकिर्द
सौरव गांगुलीने 1992 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्याने 1996 मध्ये कसोटी पदार्पण केले आणि 2003 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले. या स्पर्धेत गांगुलीने भारताला उपविजेतेपद मिळवून दिले. या माजी कर्णधाराने आपल्या कारकिर्दीत एकूण 113 कसोटी आणि 311 एकदिवसीय सामने खेळले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 7212 धावा केल्या आणि यात 16 शतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 11,363 धावा केल्या, त्यात 22 शतकांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -