ताजी बातमी ऑनलाईन टीम
आयपीएल 2022 संपल्यानंतर संघांनी त्यांचे विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे. गुणतालिकेतील तळाच्या संघांमध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांचा समावेश आहे. या संघांनी आता नव्याने IPL 2023 ची तयारी सुरू केली आहे.
या अनुषंगाने सुरेश रैनाबद्दल (suresh raina) एक मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक, तुम्हाला माहिती आहेच की, मेगा लिलावात रैनाला ना रिटेन केले गेले ना त्याला विकत घेतले गेले. तेव्हापासून रैना आणि चेन्नई संघ व्यवस्थापनातील संवाद पूर्णपणे थांबला होता, मात्र पुन्हा एकदा दोघांमध्ये चर्चा सुरू झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जच्या ट्विटर हँडलने सुरेश रैनाच्या (suresh raina) तडफदार खेळीचा एक फोटो शेअर केला आहे. 2014 साली किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात रैनाने शानदार खेळी केली होती. त्याची ही फटकेबाजी चेन्नईला पुन्हा आठवली आहे. रैनानेही हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. तसेच थंब्सअप इमोजी पोस्ट करत सीएसकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यानंतर अशी शक्यता निर्माण झाली आहे की रैना पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होईल.




