आयपीएलचा (IPL) हंगाम संपला आहे आणि आता टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा होणार आहे. त्याचं वेळापत्रक याआधीच जाहीर झालं आहे. आता वेस्ट इंडिजने टीम इंडियाच्या दौऱ्याचा (India vs West Indies) कार्यक्रम घोषित केलाय. अजून काही दिवसांतच म्हणजेच जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये भारतीय टीम वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यात किती सामने?
टीम इंडिया 3 एकदिवसीय सामने आणि 5 T-20 सामने खेळणार आहे. कॅप्टन रोहित शर्मा भारतीय टीमचं नेतृत्व करणार असून ही टी-20 वर्ल्ड कपची (T20 World Cup) तयारी करण्यासाठी छान संधी आहे. एकदिवसीय सामने संध्याकाळी 7 वाजता तर T-20 सामने संध्याकाळी 8 वाजता सुरू होणार आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये 9 जूनपासून 5 टी-20 सामन्यांच्या सीरीजला सुरूवात होतेय. या सीरिजसाठी विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली गेलीय. यानंतर टीम इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा झाला की, वेस्ट इंडिज दौऱ्यावर वनडे सामन्याने सीरिज सुरू होणार आहे.
पहिला सामना 22 जुलैला त्रिनिदादमध्ये होईल, तर अखेरची मॅच 7 ऑगस्टला फ्लोरिडामध्ये खेळवली जाणार आहे. तसेच वेस्ट इंडिजसोबतच्या टी-20 सीरिजमधील शेवटचे दोन सामने अमेरिकेच्या फ्लोरिडामध्येच होईल, अशी माहीती आहे. टी-20 वर्ल्ड कप 2024 चं आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत असल्याने इकडेच सामने खेळवले जाणार आहेत.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये बारकाईने पाहिलं तर भारताची विजयी टक्केवारी 75 टक्के आहे. दोन्ही संघांत आतापर्यंत 136 एकदिवसीय सामने झाले त्यातील 67 सामन्यांमध्ये भारत जिंकला तर 63 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजला विजय मिळाला आहे. 2 मॅच अनिर्णित झाल्या असून, इतर 4 सामन्यांचे निकाल लागले नाहीत.
भारताचा वेस्ट इंडिज दौरा
पहिली वनडे – 22 जुलै, त्रिनिदाद
दुसरी वनडे – 24 जुलै, त्रिनिदाद
तिसरी वनडे – 27 जुलै, त्रिनिदाद
पहिली टी-20 – 29 जुलै, त्रिनिदाद
दुसरी टी-20 – 1 ऑगस्ट, सेंट किट्स
तिसरी टी-20 – 2 ऑगस्ट, सेंट किट्स
चौथी टी-20 – 6 ऑगस्ट, फ्लोरिडा
पाचवी टी-20 – 7 ऑगस्ट, फ्लोरिडा