धारदार हत्याराने भोसकून युवकाची निघृण हत्या झाली. ही धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोण्णूर येथे घडली आहे.
माहितीनूसार ४२ वर्षीय दुन्डय्या नंदीकोळ्ळमठ असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तो मूळचा हुक्केरी तालुक्यातील रहिवासी आहे. अज्ञातांनी त्याच्या डोक्याजवळील भागावर वार करून त्याचा खून करून पळ काढला. दुन्डय्या हुक्केरीहून कोण्णूर येथे राहणाऱ्या आपल्या पत्नीला भेटण्यासाठी आला होता. हे पाहून हल्लेखोरांनी रात्री उशिरा संधी साधून त्याचा खून केला आहे. या खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. खुनाची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी जाळे विणले आहे.