हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सहा जून या राज्याभिषेकदिनी मुरगूडमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून येथे नव्यानेच लोकार्पण करण्यात आलेल्या शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती शिवप्रेमींनी पत्रकार परिषदेत दिली.
संयुक्त गावभाग मुरगूड यांच्यावतीने या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ५ जून रोजी संध्याकाळी आठ वाजता जय भवानी गोंधळ ग्रुप कोल्हापूर व समस्त गोंधळी समाज मुरगूड यांच्या वतीने भवानी गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ६ जून रोजी सकाळी शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिषेक घालण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
शिवराज्याभिषेक दिनी दुपारी दोन वाजता हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दुपारी चार वाजता अंबाबाई मंदिर मुरगूड येथून भव्य दिव्य सजीव देखाव्यांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे