Tuesday, July 29, 2025
Homeसांगलीसांगली : या ठिकाणी बनावट नोटांचा कारखाना

सांगली : या ठिकाणी बनावट नोटांचा कारखाना

सांगलीत विश्रामबाग येथील वारणालीत बनावट नोटांचा कारखाना असल्याचा धक्कादायक प्रकार इस्लामपूर पोलिसांच्या तपासातून पुढे आला आहे. यामध्ये मोठी टोळी कार्यरत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा कारखाना सुरू आहे. टोळीने आतापर्यंत सुमारे पन्नास लाख रुपयांच्या नोटांची छपाई करुन त्या पश्चिम महाराष्ट्रात चलनात आणल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

इस्लामपूर पोलिसांनी बनावट नोटांची छपाई करणाऱ्या टोळीचा नुकताच पदाफाश केला आहे. टोळीतील चौघांना अटक केली आहे. मुख्य सुत्रधार रमेश चव्हाण हा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याच टोळीने स्थानिक गुन्हेगारांची मदत घेऊन सहा महिन्यांपासून नोटा छपाईचा कारखाना सुरू केला.

बनावट नोटांच्या माध्यमातून या टोळीने सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांत चांगलेच हातपाय पसरले. पोलिसांच्या हाती या टोळीतील काहीजण लागूनही बनावट नोटा अजूनही राजरोसपणे चलनात येत असल्याने या टोळीचा पूर्णपणे छडा लावणे, हे एक पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून ही टोळी सांगलीत विश्रामबाग येथील वारणालीत बनावट नोटांची अगदी खुलेआम छपाई करीत होती. ही बाब विश्रामबाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला समजली नसावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घसघसशीत कमिशन व आकर्षक पगार, यामुळे बेरोजगार तरुण या टोळीमध्ये दाखल झाले असावेत. जोपर्यंत याची पाळेमुळे खणून काढली जात नाहीत, तोपर्यंत टोळीचे हे कारनामे सुरुच राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -