कोडोली येथील ग्रामसभेमध्ये विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय एक मताने मंजूर झाला. अध्यक्षस्थानी सरपंच गायत्री पाटील होत्या. विषयाचे वाचन ग्रामसेवक जयवंत चव्हाण पाटील यांनी केले. विधवा प्रथा बंदीचा ठराव स्वप्निल सातवेकर यांनी मांडला. या ठरावास उदयसिंह पाटील, वीरेंद्र पाटील, सुरेश पाटील, दीपक सकटे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी वीरेंद्र पाटील उदयसिंह पाटील, सुरेश पाटील, दीपक सकटे, रवींद्र गाताडे, नयन गायकवाड, विलास पाटील यांनी गावहिताचे प्रश्न मांडले. ग्रामसभेला उपसरपंच माणिक मोरे, कोडोली पोलीस ठाण्याचे स. पो. नि शीतलकुमार डोईजड, मानसिंग पाटील, निखिल पाटील, प्रवीण जाधव, मोहन पाटील, बाजीराव केकरे, प्रकाश पाटील, डॉ. प्रशांत जमणे, प्रकाश हराळे आदी उपस्थित होते.