ताजी बातमी ऑनलाईन टीम
बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने नुकताच आपला 50वा वाढदिवस साजरा केला. मुंबईतील अंधेरी इथल्या यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये त्याने जंगी बर्थडे पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला हृतिक रोशन, शाहरुख खान, कतरिना कैफ, कियारा अडवाणी, जान्हवी कपूर, मलायका अरोरा, करीना कपूर, सैफ अली खान यांसारखे बॉलिवूडमधील असंख्य कलाकार उपस्थित होते. यात बर्थडे पार्टीतील जवळपास 50 ते 55 सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय. ‘बॉलिवूड हंगामा’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
“पार्टीनंतर फिल्म इंडस्ट्रीतील करण जोहरच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना कोविडची लागण झाली आहे. काही कलाकार याबद्दलची माहिती उघड करत नाही आहेत. अभिनेता कार्तिक आर्यनलाही कोरोनाची लागण झाली आहे. कार्तिक आर्यन ज्या अभिनेत्रीसोबत मिळून चित्रपटाचं प्रमोशन करत होता, ती अभिनेत्री करणच्या पार्टीला हजर होती”, अशी माहिती सूत्रांनी ‘बॉलिवूड हंगामा’ला दिली.
याआधीही करण जोहरची पार्टी कोरोनाच्या संसर्गामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. करणने त्याच्या घरी छोट्या पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत उपस्थित राहिलेल्या सेलिब्रिटींना ५ नंतर कोरोनाची लागण झाली होती. करीना कपूर खान, अमृता अरोरा, सीमा खान, महीप कपूर यांना कोरोनाची लागण झाली होती. यावरून राजकीय नेत्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला होता. अखेर करणला सोशल मीडियावर पोस्ट लिहून स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. ‘माझ्या घरी पार्टी नव्हती, तर फक्त आठ जण छोट्याशा गेट-टुगेदरसाठी एकत्र आले होते. आम्ही सर्वांनी कोविडच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं होतं’, असं त्याने म्हटलं होतं.
Covid 19: करण जोहरची पार्टी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; पार्टीतील 50-55 सेलिब्रिटींना कोरोना?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -