ताजी बातमी ऑनलाईन टीम
जैवविविधता आणि वन्यजीवांसंदर्भात केंद्र सरकार ज्या पध्दतीने धोरणे राबवित आहे, त्यामुळे वन्यजीवांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे, असे स्पष्ट करत निर्धारित वेळे आधीच पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
‘जमीन वाचवा आंदोलन’ या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, जैवविविधता आणि वन्यजीवांसंदर्भातील सरकारच्या धोरणांमुळे वाघ, बिबटे आणि हत्तींसह इतर वन्यजीवांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जैवविविधतेला सरकारने खूप महत्त्व दिले आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावरील गावांमध्ये नैसर्गिक शेतीसाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद हे त्याचे ताजे उदाहरण आहे.