Tuesday, December 24, 2024
Homeब्रेकिंगस्पर्धा निकाल : 'माझी वसुंधरा' अभियानात कराड नगरपालिका राज्यात प्रथम

स्पर्धा निकाल : ‘माझी वसुंधरा’ अभियानात कराड नगरपालिका राज्यात प्रथम

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कराड ; राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत आयोजित स्पर्धेत कराड नगरपालिकेने सलग दुसऱ्यावर्षी सर्वोत्तम कामगिरी केली. रविवारी या स्पर्धेचा निकाल मुंबईत जाहीर झाला. यात राज्यातील नगरपरिषद गटात कराड नगरपालिकेने पहिला क्रमांक पटकावत सुमारे 5 कोटींचे बक्षीस पटकावले आहे.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, रोकडे, मुझफ्फर नदाफ, सुरेशं शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत “माझी वसुंधरा” हे पर्यावरण रक्षण व संवर्धनसाठीचे अभियान सुरू करण्यात आले आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा व ग्रामपंचायती यांनी या अभियानात सहभाग नोंदवला होता. पर्यावरण रक्षण व संवर्धन संदर्भात केलेल्या कामगिरीच्या आधारे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -