Monday, July 28, 2025
Homeकोल्हापूरकेर्ली येथील महिलेचा मोटारीच्या धडकेत मृत्यू

केर्ली येथील महिलेचा मोटारीच्या धडकेत मृत्यू

करवीर तालुक्यातील केर्ली परिसरात मोटारीच्या धडकेत ५६ वर्षीय महिला शालाबाई मधुकर कांबळे गंभीर जखमी झाली होत्या. उपचारासाठी त्यांना सीपीआर या ठिकाणी दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शालाबाई कांबळे या सायंकाळी पिठाच्या गिरणीतून दळप घेऊन घरी जात होत्या. त्यावेळी त्यांना रत्नागिरी ते कोल्हापूर दिशेने. येणाऱ्या मोटारीने जोराची धडक दिली. त्यांना त्याच मोटारीतून सीपीआरमध्ये आणल्याचे नातेवाईकांनी सांगितले. अपघातामध्ये मृत महिलेच्या नातेवाईकांना पोलिसाकडून चुकीची वागणूक मिळाल्याचा आरोप करत या संतप्त नातेवाईकांनी सीपीआर अपघात विभागा जवळ ठिय्या मारला होता.

याबाबत संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या नातेवाईकांकडून करण्यात येत होती. दरम्यान करवीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी नातेवाइकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र ते ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. रात्री अकराच्या दरम्यान घटनास्थळी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी गोकुल राज जी यांनी नातेवाईकांची समजूत काढत संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. संबंधित घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली , असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -