Tuesday, July 29, 2025
Homeसांगलीसांगली : कॉलेज युवतीस जीवे मारण्याची धमकी

सांगली : कॉलेज युवतीस जीवे मारण्याची धमकी

सांगली येथे एका महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून प्रेम करण्याची जबरदस्ती करत तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा त्रास रोडरोमिओकडून एक वर्षे सुरू होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्रास देणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. उमर सलीम महात (वय 20) असे संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, पीडित मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह शहरात राहते. सांगलीतीलच एका महाविद्यालयात ती शिक्षण घेत आहे. गेल्या एक वर्षापासून संशयित उमर हा तिचा पाठलाग करून त्रास देत होता. त्याच्या भीतीपोटी पीडित तरुणीने घरी काही सांगितले नाही. दि. 2 जूनरोजी पीडित मुलगी ही कामानिमित्त निघाली होती. यावेळी संशयित महात याने जे. पी. ग्रुप चौक येथे पीडितेला रस्त्यावर अडविले. ‘माझ्यावर प्रेम करतेस की नाही, असे म्हणत धमकावू लागला. पीडितेने त्याला विरोध केल्यानंतर ‘तुझे दुसऱ्यासोबत लग्न ठरल्यास तुला ठार मारून टाकीन, अशी धमकी त्याने यावेळी दिली. यानंतर घडलेला सर्व प्रकार पीडितेने कुटुंबियांना सांगितला. पीडितेच्या आईने सांगली शहर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित उमर महात याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने उमर याला अटक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -