ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई : राज्यात नेत्यांना धमक्या येणे ही प्रकरणं अजूनही चर्चेत असाताना आता हे लोन बॉलिवूडपर्यंत पोहोचलं आहे. कारण आता बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. हे लेटर सलीम खान यांच्या बॉडिगार्डला मिळालं आहे. सलमान खान वॉकला जातो आणि जिथे ब्रेक घेतो त्या ठिकाणी हे पत्र आढळून आले आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे.
बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना भयंकर धमक्या देणारे एक निनावी पत्र रविवारी वांद्रे बँडस्टँडच्या विहाराजवळ सापडले. वांद्रे पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, हे पत्र सलीम खानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना एका जागेवर सापडले आहे. “सलीम खान सकाळच्या वेळी त्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह विहाराच्या ठिकाणी फिरायला जातो. तेथे एक जागा आहे जिथे तो सहसा विश्रांती घेतो. तिथे एका बेंचवर एक चिठ्ठी मागे ठेवली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.