ताजी बातमी ऑनलाईन टीम
इचलकरंजी मटकाकिंग अग्रवाल याच्या शहरातील मटकाबुकीवर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच मटकाकिंग सुभाष अग्रवाल रा. सहकारनगर, इचलकरंजी आणि बुकी मालक संपत नवनाळे रा. वेताळ पेठ, इचलकरंजी हे पळून गेले.
तर बुकीमध्ये काम करीत असलेल्या सहा जणांना अटक केली गेली आहे. त्याच्याकडून ७ हजार ५०० रुपयांसह तीन दुचाकी, एक प्रिंटर आणि जुगाराचे साहित्य असा २ लाख ४१ हजार ३० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली. शहापूर पोलिसात झाली आहे.