Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगआजपासून हेल्मेट सक्ती, बाईकवरील दोन्ही व्यक्तींना हेल्मेट बंधनकारक

आजपासून हेल्मेट सक्ती, बाईकवरील दोन्ही व्यक्तींना हेल्मेट बंधनकारक

मुंबईत दुचाकी चालक आणि मागे बसणाऱ्यांसाठी आज, गुरूवारपासून नवा नियम लागू करण्यात आला आहे. तो म्हणजे दुचाकी चालकासोबत पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणे बंधनकारक (Helmet forced)  करण्यात आले आहे. नियमाचे उल्लघंन करणाऱ्या दुचाकी चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police)  दिली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी 15 दिवसांपूर्वी याबाबत नोटीस जारी केली होती. त्यानुसार आज, 9 जूनपासून हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे.

 

ई-चलानद्वारेही दंड आकारणार

मुंबई वाहतूक पोलिसांकडून आजपासून विशेष मोहीम सुरु करण्यात येणार आहे. प्रत्येक जंक्शन आणि रस्त्यावर वाहतूक अधिकारी तैनात असतील. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणारे आणि मागे बसणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिस ई-चलानद्वारेही दंड आकारणार आहेत. हेल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारासह पाठीमागे बसणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी 25 मे रोजी या संदर्भात आदेश जारी केला होता. हेल्मेट न घातल्यामुळे रस्ते अपघातात जखमी आणि मृत होणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

 

किती आकारला जाणार दंड?

नवीन नियमाचे उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये 500 रुपये दंड तसेच 3 महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. सरकारकडून देखील या नियमाला मान्यता दिली आहे. हेल्मेट घालणे दुचाकी चालक आणि त्याच्यामागे बसणाऱ्यांच्या हिताचे असल्याचे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.

 

कोणाला मिळणार सूट?

मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले की, पगडी परिधान करणाऱ्या शीखांना हेल्मेट सक्तीतून सूट देण्यात आली आहे.

 

दुचाकीस्वारांकडे कोणती दस्ताऐवज आवश्यक?

– ड्रायव्हिंग लायसन्स (मूळ प्रत)
– रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी)
– इन्शुरन्स सर्टिफिकेट इन्शुरन्स सर्टिफिकेट
– प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (मूळ प्रत)
– डीएल आणि प्रदूषण प्रमाणपत्र मूळ

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -