Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगआधी मैत्री मग न्यूड कॉल… प्रेमी युगलाचा फसवणुकीचा धंदा!

आधी मैत्री मग न्यूड कॉल… प्रेमी युगलाचा फसवणुकीचा धंदा!

सोशल मीडिया जेवढा आपल्यासाठी वरदानासारखा सिद्ध होत आहे. तेवढाच तो शाप असल्याचा प्रत्यय देखील अनेक मार्गातून आपल्याला येत असतो. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये इंस्टाग्रामवर फेक प्रोफाईल बनवून तरुणांशी मैत्री करणाऱ्या आणि प्रेमाचे नाटक करून आक्षेपार्ह व्हिडीओ बनवणाऱ्या एका टोळीचा इंदूर गुन्हे शाखेकडून पर्दाफाश झाला आहे.

या टोळीने आतापर्यंत 20 जणांना आपल्या जाळ्यात अडकवले आणि त्यांच्याकडून पैसे लुटले आहेत. या पाच आरोपी मध्ये एका तरुणीचा देखील समावेश असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. रीवा येथील हिमांशू तिवारी नावाच्या एका मुलाने आपल्या प्रेयसीला हाताशी घेत ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू केला आणि त्यानंतर अनेक मित्रांना याद्वारे बोलावून घेतले. हे सर्वजण मिळून सेक्सटॉर्शन करत होते. इंदूर गुन्हे शाखेकडे आलेल्या तक्रारीनुसार एका तरुणीने आधी मैत्री केली आणि त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्याच्या सोबत अश्लील व्हिडिओ देखील बनवला.

हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याला घाबरवण्याचा प्रयत्न सुरु झाला आणि त्यातून हा प्रकार त्याने पोलिसांना सांगितला. तसेच पोलिसांनी चौकशी केल्यानंतर रीवा येथील हिमांशू तिवारीला देखील अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्याने आपण हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला.

व्हिडिओ कॉलवर बोलताना ती तरुणी संवादादरम्यान अनेकदा स्वतःचे कपडे काढायची. इतकेच नाही तर, ज्यासोबत ती व्हिडिओ कॉल करत आहे त्या व्यक्तीला देखील कपडे काढायला उत्तेजीत करायची. त्यानंतर सुरू व्हायचा तो ब्लॅकमेलिंगचा खेळ! याद्वारे अनेक तरुणांना तिने आपल्या जाळ्यात ओढले होते आणि असेच प्रकार इतर चौघेजण देखील करत होते. हिमांशू हा मुख्य गुन्हेगार स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी रीवा वरून इंदूर येथे आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -