Wednesday, July 30, 2025
Homeसांगलीकर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्त्या

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्त्या

जत तालुक्यातील येळदरी येथील अर्जुन तम्माण्णा देवकाते (वय 38) या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून मळ्यातील राहत्या घरात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली.

जत तालुक्यातील येळदरी येथील अर्जुन तम्माण्णा देवकाते (वय 38) या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून मळ्यातील राहत्या घरात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. याबाबत जत पोलिसांत नागेश शेड्याळ यांनी फिर्याद दिली आहे. अर्जुन तम्माण्णा देवकाते याचा येळदरी येथे पाच एकर शेती आहे. त्यापैकी तीन एकराची द्राक्ष शेती आहे. तसेच त्यांचा स्वत:चा छोटा टेंपो असून ते स्वत: चालक म्हणून काम करत होते. त्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

आज त्यांची पत्नी शेतात काम करण्यास गेली असता अर्जून यांनी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ते बघून त्यांच्या लहान मुलगी आरडाओरड केली. त्यानंतर आजुबाजूच्या लोकांनी त्यांना तातडीने जत येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र ते मयत झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणला. अर्जुनचा मेव्हणा नागेश यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -