Saturday, August 2, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : केएमटीचा प्रवास आजपासून महागणार

कोल्हापूर : केएमटीचा प्रवास आजपासून महागणार

ताजी बातमी ऑनलाईन टीम


कोल्हापूर : विविध कारणांनी आर्थिक आरिष्टात सापडलेल्या केएमटीने प्रवाशांना दरवाढीचा झटका दिला आहे. पहिल्या टप्प्यासाठी आठ रुपयांऐवजी दहा रुपये आकारण्यात येणार आहेत. शुक्रवारी (दि. 10) पहाटेपासून दरवाढीची अंमलबजावणी केली जाणार आहे. ना नफा ना तोटा तत्त्वानुसार चालणाऱ्या केएमटीला रोज सुमारे अडीच लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागतो.



सप्टेंबर 2018 मध्ये तिकीट दरवाढ झाली त्यावेळी डिझेलचा दर 72 रुपये होता. सध्या डिझेलचा दर सुमारे 96 रुपये आहे. केएमटीचा दैनंदिन खर्च सध्या 15 लाख आहे. खर्चाच्या पार्श्वभूमीवर केएमटी प्रशासनाने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. के.एम.टी. उपक्रमाच्या सुधारित प्रवासी भाडे दरपत्रकास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -