Saturday, August 2, 2025
Homeसांगलीरात्रगस्तीमध्ये बंद मेडिकल स्टोअर्स फोडणारे सराईत चोरटे जेरबंद..!१ अटक व २...

रात्रगस्तीमध्ये बंद मेडिकल स्टोअर्स फोडणारे सराईत चोरटे जेरबंद..!१ अटक व २ परांगदा एकुण ४ दाखल गुन्हे उघडकीस

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पारख मेडिकल एसटी स्टॅन्ड जवळ सांगली येथे एक सेंट्रो मोटर कार मध्ये तीन इसम संशयित रित्या गाडीमध्ये दिसले. त्यातील अटक आरोपी यांनी आपल्या हातात एक मोठी कटावणी,कटर,दोन पत्र्याच्या चाव्या एक स्टील तार घेऊन खाली उतरला व पारेख मेडीकल जवळ जाऊन मेडीकलचा दरवाजा उचकटत असताना दिसला.त्यावेळी हवालदार त्यांच्याकडे चौकशी करण्यासाठी जवळ जात असताना गाडीतील आरोपी हे भरधाव वेगाने गाडी पळवून एसटी स्टॅन्ड कडे निघून गेले.



त्यातील जो मेडीकलचा दरवाजा उचकटत होता तो आरोपी तलवारसिंग जरनेलसिंग सरदार वय वर्ष २४ राहणार मवाडी तालुका धुळे जिल्हा धुळे ह्याला अटक करुन कटावणी,कटर,दोन पत्र्याच्या चाव्या एक स्टील ताब्यात घेतली आहे.त्याच्याकडे चौकशी केली असता जे पळून गेलेले साथीदार आहेत त्यांची नावे सांगितली आहेत.त्यातील एक आरोपी संजुसिंग कृष्णा सिंग बहादा राहणार जालना दुसरा आरोपी सोनुसिंग शिकलीगार राहणार अंबर जिल्हा जालना हे पळून गेले आहेत.त्यांचा शोध सांगली शहर शाखेचे पथक करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -