Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीत स्कूल बसला अपघात, लालपरीशी धडक, जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

इचलकरंजीत स्कूल बसला अपघात, लालपरीशी धडक, जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

ताजी बातमी ऑनलाईन टीम

इचलकरंजीः इचलकरंजी शहरात आज भीषण अपघात झाला. शहरातील जनता चौकात राज्य परिवहन मंडळाची बस आणि एक खासगी स्कूल बस यांची धडक झाली. जनता चौकात ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, यात काही प्रवासी आणि विद्यार्थी जखमी झाले. दोन्ही बसचंही मोठं नुकसान झालं. यातील काही मुलांना गंभीर जखम झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इचलकरंजी शहरात दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील काही दिवसात यामुळे जीवितहानीदेखील जास्त झाली आहे. आजच्या अपघातात स्कूल बसचंही नुकसान झालं तसंच एसटी बसच्याही काचा फुटल्या.



नेमकी घटना काय घडली?

शहरात आज जनता चौकामध्ये स्कूल बस आणि एसटीचा अपघात झाला. स्कूल बसचा ड्रायव्हर र अमीन पटेल हे बस घेऊन शाहू कॉर्नर कडून जनता बँक चौकाकडे येत होते. तर एसटी चालक अजित कांबळे एसटी घेऊन गांधी पुतळा होऊन एसटी स्टॅन्डकडे जात होते. सकाळी आठच्या सुमारास दोन्ही गाड्या समोरा-समोर आल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दोन्ही बस एकमेकांवर धडकल्या. यात स्कूल बसच्या ड्रायव्हर कडील बाजूस मोठा धक्का बसला. स्कूल बसमधील सीटवर बसलेले विद्यार्थी जखमी झाले आहेत तर एसटी समोरून धडक दिल्यामुळे एसटीची काच फुटली आहे यामध्ये दोन्ही वाहनातील दहा ते बारा जण जखमी झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -