ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई : देशात महागाईचा भडका
उडाला आहे. अन्नाधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि इंधनापासून ते खाद्यतेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. मर वाढत्या महागाईत एक दिलासादायक बातमी समार आली आहे. ती म्हणजे गेल्या महिनाभरात खाद्यतेलाच्या किमतींमध्ये 9 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
खाद्यतेल स्वस्त झाले असून, पुढील काही महिन्यांमध्ये खाद्यतेलाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारत खाद्यतेलाचा पुरवठा वाढल्याने किमती कमी झाल्या आहेत. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सूर्यफूल तेल, मोहरीचे तेल, पाम ऑईल आणि नारळ तेलाच्या दरात दोन ते तोरा टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. त्याचा परिणाम हा भारतीय बाजारपेठेवर देखील झाला असून, सूर्यफूलाचे तेल वगळता भारतात इतर तेलाचे दर स्वस्त झाले आहेत.