Monday, November 24, 2025
Homeमनोरंजनभर पावसात रडरडत पोलिस स्टेशनला पोहचली Rakhi Sawant, रितेशविरोधात केली तक्रार दाखल!

भर पावसात रडरडत पोलिस स्टेशनला पोहचली Rakhi Sawant, रितेशविरोधात केली तक्रार दाखल!

ताजी बातमी ऑनलाईन टीम
बॉलिवूडची ड्रामा क्वीन अर्थात बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर राखी सावंत तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच राखी सावंतने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला होता. तिने तिचा पती रितेश सिंहला घटस्फोट दिला होता. सोशल मीडियावर पोस्ट करत राखी सावंतने घटस्फोट घेतल्याचे सांगितले होते. आता राखी सावंत रितेशमुळे चिंतेत आली आहे. राखी सावंत भर पावसात रडतरडत पोलिस स्टेशनला गेली. तिने पूर्वाश्रमीचा पती रितेश सिंहच्याविरोधात तक्रार दाखल केली. तिचा रडत असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.



व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की राखी सावंत पूर्वाश्रमीचा नवरा रितेशवर संशय घेत आहे. राखी सावंतचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. पूर्वाश्रमीचा नवरा रितेशने तिचे अकाऊंट हॅक केल्याचा आरोप तिने केला आहे. याप्रकरणीच रितेशविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी राखी सावंतने पोलिस स्टेशन गाठले. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये राखी सावंत रडताना दिसत आहे. राखी सावंतसोबत तिचा बॉयफ्रेंडसुद्धा पोलिस स्टेशनला आला होता. रितेशविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर राखी सावंतने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने रितेशवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की, ‘मला माहित आहे की मी 3 वर्षे कशी काढली. लॉकडाऊनमध्येही एकटे पडले होते. म्हणूनच मी त्याला सोडले. देवाने असा पती कोणाला देऊ नये. आता त्याच्याविरुद्ध तक्रार करत आहे.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -