Friday, July 25, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी ; मटका जुगारप्रकरणी एकावर गुन्हा

इचलकरंजी ; मटका जुगारप्रकरणी एकावर गुन्हा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

इचलकरंजी ; येथील स्टेशन रोडवर महाराष्ट्र बँकेसमोर असलेल्या दुकानावर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून मटका जुगार प्रकरणी एकावर गुन्हा नोंद केला आहे. संजय बाळासाहेब किणेकर वय ४४ रा. श्रीपादनगर असे त्याचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी २३३० रुपयांची रोकड व मटका जुगाराचे साहित्य असा २३३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्टेशन रोडवर किणेकर हा पांढऱ्या रंगाच्या चिठ्यावर आकडे लिहून देत मटका जुगार चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून किणेकर याला ताब्यात घेतले.



सेंटरमधून ताब्यात घेतलेल्यांना कारवाई न करता केवळ नोटीस देऊन सोडण्यात आले. यामागे मोठा अर्थ दडला असल्याची चर्चा दबक्या आवाजातील चर्चा खुद्द पोलिस वर्तुळातूनच ऐकावयास मिळत आहे. या प्रकरणी पो.कॉ. अमित श्रीकांत कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -