Friday, November 22, 2024
Homeबिजनेसपीपीएफच्या नियमांत बदल, मॅच्युरिटीपूर्वीही काढू शकता पूर्ण पैसे, जाणून घ्या प्रक्रिया?

पीपीएफच्या नियमांत बदल, मॅच्युरिटीपूर्वीही काढू शकता पूर्ण पैसे, जाणून घ्या प्रक्रिया?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानला जातो. पीपीएफमध्येही (PPF) खूप चांगले व्याज मिळते. तसेच गुंतवलेले पैसे आणि त्यावर मिळणारे व्याज यासह मॅच्युरिटी कालावधी (PPF Maturity Period) पूर्ण झाल्यावर मिळाणाऱ्या रकमेवरही करात सूट मिळते. या कारणामुळे हा पर्याय गुंतवणूकदारांमध्ये (PPF Investment) खूप लोकप्रिय आहे.

पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे. त्यात गुंतवलेले पैसे मध्ये काढता  येत नाहीत असा काहींचा गैरसमज आहे. परंतु हा समज अगदी चुकीचा आहे. पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच काही विशिष्ट परिस्थितीत तो बंद केला जाऊ शकतो. कोणत्या परिस्थितीत यामधून पैसे आधीच काढता येतात आणि त्याची प्रक्रिया काय आहे हे समजून घेऊया.

या परिस्थितीत मुदतपूर्तीपूर्वीच पैसे काढता येते
PPF खातेधारक जोडीदार आणि मुले आजारी पडल्यास पैसे काढू शकतात. याशिवाय खातेदार त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पीपीएफ खात्यातून पूर्ण पैसे काढू शकतात. याशिवाय एखादा खातेदार अनिवासी भारतीय (NRI) बनला तर अशा परिस्थितीत तो त्याचे PPF खाते बंद करू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -