Saturday, July 27, 2024
Homenewsघोड्यावर स्वार होत शिल्पा शेट्टी हिचं नवऱ्यासाठी वैष्णो देवीला नवस?

घोड्यावर स्वार होत शिल्पा शेट्टी हिचं नवऱ्यासाठी वैष्णो देवीला नवस?



अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या काही महिन्यांपासून पती राज कुद्रामुळे चर्चेत आहे. अश्लील चित्रपट बनवून ते अॅपद्वारे प्रसिद्ध केल्याबद्दल मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केल्याने कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

दरम्यान, शिल्पा शेट्टी आज माता वैष्णो देवीच्या दरबारात जाऊन नतमस्तक झाली असल्याचे पाहायला मिळाले. शिल्पा शेट्टी कुंद्रा बुधवारी जम्मू -काश्मीरच्या कटरा येथे दिसली.
माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी शिल्पा कटरा येथे पोहोचली होती. तेथील काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पती राज कुंद्राला अटक झाल्यापासून शिल्पा शेट्टी या दिवसात खूपच त्रस्त आहे, अशा परिस्थितीत शिल्पा राज आणि तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी नवस मागण्यासाठी वैष्णो देवीला पोहोचली असल्याचे समजते.

येथे पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात ती दर्शनासाठी घोड्यावर बसून निघून गेली. तिच्यासोबत पोलीस कर्मचारीही उपस्थित होते.
दर्शनासाठी जाताना दिसल्याने ”घोड्यावरून स्वार होत शिल्पा शेट्टीने नवऱ्यासाठी नवस केला” अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

गणरायाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केल्याने शिल्पा ट्राेल
दोन दिवसांपूर्वी शिल्पाने घरी गणरायाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केल्याने तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. कुंद्रा जेलमध्ये आहे. आणि ती आपल्या मुलांसोबत आनंदोत्सव साजरा करतेय, असं म्हणत तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

एका युजरने शिल्पाला ट्रोल करत लिहिलंय, ‘आधी आपल्या पतीला तरी घेऊन ये.’ तर दुसरीकडे युजरने लिहिलंय की, ‘राजचं काय झालं? काय तो आताही जेलमध्ये आहे. त्याला जामीन मिळाला काय?’ तर एकाने लिहिलं, ‘पतीला तरी येऊ दे.’ असे म्हटले आहे.

राज कुंद्रा अश्लील चित्रपट बनवणे आणि ते अॅपमध्ये डाऊनलोड आणि रिलीज केल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. तो १९ जुलै २०२१ पासून तुरुंगात आहे. त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही.

राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आता १६ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. ८ सप्टेंबर रोजी राज कुंद्राच्या वकिलांनी न्यायालयात अपील केले. न्यायालयाने त्यांचे अपील स्वीकारले आणि पुढील सुनावणीची तारीख १६ सप्टेंबर निश्चित केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -