काेल्हापूर मध्ये पत्नीचा खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. काेल्हापूर मध्ये पत्नीचा खून केल्यानंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. कोमल निशिकांत चव्हाण (वय-२८, रा. माधवनगर, कणेरी. तालुका करवीर) या महिलेचा खून झाला असून निशिकांत सुरेश चव्हाण (वय-३२) असे पतीचे नाव आहे. गोकूळ शिरगाव पोलिसांनी पती निशिकांत चव्हाण याला अटक केली आहे.
कोमलचे माहेर कोल्हापूर शहरातील दौलतनगर आहे.
विवाहितेचा खून झाल्याची माहिती मिळताच दौलतनगर परिसरात नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली असून पोलीस निरीक्षक परवीन पाटील यांच्यासह इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संशयातून हा खून झाला असावा, असे तपास अधिकारी प्रवीण पाटील यांनी सांगितले.
काेल्हापूर पत्नीचा खून ; पतीला अटक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -