गुमास्ता कामगारांची वेतनवाढ करा, यार्डात काम करणाऱ्या महिला कामगारांना माथाडी कायदा लागू करा, यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर हमाल गुमास्ता पंचायतीच्या वतीने सोमवारी मार्केट यार्डात काम बंद आंदोलन केले. या आंदोलनात कांदा-बटाटा विभागातील सर्व माथाडी कामगार सहभागी झाले होते. यामुळे कांदा मार्केटमधील कामकाज ठप्प झाल्याने 1 कोटीची उलाढाल ठप्प झाली.
माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हमाल गुमास्ता पंचायतीच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाचा भाग म्हणून कामगारांनी शाहूपुरी येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला कामगार सहभागी झाल्या होत्या.