भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. सैन्य दलातील भरतीसाठी केंद्र सरकारने ‘अग्निपथ’ योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी या योजनेची घोषणी केली.. या योजनेनुसार, आर्मी, नौदल व हवाई दलात होणाऱ्या भरतीबाबत अनेक बदल करण्यात आले आहेत.
नौदल, लष्कर व हवाई दलाच्या प्रमुखांनी दोन आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन ‘अग्निपथ’ योजनेबाबत माहिती दिली होती.. त्यानंतर सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने ऐतिहासिक निर्णय घेताना, ‘अग्निपथ’ योजनेला मंजुरी दिली. त्याअंतर्गत तरुणांना सैन्य दलात सेवेची संधी मिळणार असल्याची माहिती मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली..
अग्निपथ’ योजनेबाबत..
सैन्य दलात भरती झालेल्या 80 टक्के तरुणांची सेवा 4 वर्षांनंतर समाप्त होणार आहे. उर्वरित 20 टक्के सैनिकांना पुन्हा तिन्ही सेना दलात काम करण्याची संधी मिळेल.
निवृत्तीनंतर 20 टक्के सैनिकांना 30 दिवसांत परत बोलावण्यात येईल. त्यांना रुजू होण्यासाठी नव्याने तारीख दिली जाईल. वेतन, निवृत्तीवेतन निश्चित करण्यासाठी पूर्ण झालेल्या सेवेत त्यांची मागील 4 वर्षांची कंत्राटी सेवा गणली जाणार नाही.
भारतीय सैन्यातील जवानांचे सरासरी वय 35 वर्षांवरून 25 वर्षांपर्यंत कमी होईल.
अग्निपथ योजनेंतर्गत लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये पहिल्या वर्षी 25 हजारांहून अधिक तरुणांची भरती होऊ शकते.
दरम्यान, ‘अग्निपथ’ योजना यशस्वी झाल्यास सरकारची पगार, भत्ते व पेन्शनवरील हजारो कोटी रुपयांची बचत होईल, असा सशस्त्र दलाचा अंदाज आहे. लष्करी व्यवहार विभागाने 8 देशांमध्ये लागू केलेल्या समान मॉडेल्सचा अभ्यास केल्यानंतर अग्निपथ योजना तयार करण्यात आली आहे.
दरमहा 30 हजार रुपये वेतन
‘टूर ऑफ ड्यूटी’ अंतर्गत भरती झालेल्या तरुणांना दरमहा अंदाजे 30,000 रुपये वेतन दिलं जाईल. त्यातून 9000 रुपये सरकार राखून ठेवेल. जवानाचा 4 वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर सरकार त्याला हे पैसे देणार आहे. त्याचा फायदा असा होईल, की 21 वर्षांच्या तरुणांसाठी 10 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम मिळणार आहे.