Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रहा तर महाराष्ट्राचा अपमान, अजित पवारांना भाषण करू न देणे अयोग्य!

हा तर महाराष्ट्राचा अपमान, अजित पवारांना भाषण करू न देणे अयोग्य!



पंढरपुरात अजित पवार यांना मोदींच्या सभेत भाषण न करू देणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देहूमधल्या तुकोबांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुकोबांच्या मंदिरात तसंच परिसरातल्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतलं. वारक-यांनी मोदींना वारकरी पगडी देऊन देहू नगरीत स्वागत केलं. तसंच माऊलींची मूर्ती आणि चिपळ्याही मोदींना भेट देण्यात आल्या. मोदींनी देहू नगरीतल्या नागरिकांना वंदन केलं. तुकोबांच्या ओवीनं भाषणाची सुरुवात करत मोदींनी वारक-यांशी संवाद साधला.



या वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाषण केलं. पण अजित पवारांना भाषणाची संधी न मिळाल्याने सुप्रिया सुळे न झाल्या आहेत.



उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विमानतळावर देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्यासोबत चर्चा केली.



मिटकरी, दरेकर यांच्यात वादावादी दरम्यान, या घटनेसंदर्भात एका वृत्त वाहिनीशी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अजित पवार यांना भाषण करून देण्याच्या कृतीचे समर्थन करताना, प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणे योग्य नाही. हा कार्यक्रम राजकीय नव्हता. वारकऱ्यांच्या या कार्यक्रमात वारकऱ्याला बोलू दिलं ही बाब मोठी आहे. प्रोटोकॉलचा प्रश्नच नाही. देहू संस्थानने कार्यक्रम घेतला. पीएमओ कार्यालय ठरवत नाही कुणी भाषण करायचे’ असे स्पष्टीकरण दिले.



दरेकरांच्या या वक्तव्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी आक्षेप घेत पंतप्रधान कार्यालयाने प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा दावा करताना, अजित पवार यांना फडणविसांसारखी भाषणाची हौस नाही. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे त्यांना डावलून विरोधी पक्षनेत्याला भाषण करण्याचीसंधीदेणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दात संताप व्यक्त केला. भले ते देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी’ या तुकोबांच्या अभंगाचा हवाला देत त्यांनी या घटनेच्या विरोधात राष्ट्रवादी कँग्रेस आवाज उठवेल असा इशारा दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -